आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयात अभिरुप सभा निवडणुका संपन्न!

लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करून वर्गातून प्रतिनिधी व उपप्रतिनिधी निवडून दिला.

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी अर्जुननगर (16) प्रतिनिधी.

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात 2024- 25 सालासाठीच्या अभिरुप सभेच्या निवडणुका शांततेत पारपडल्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करून वर्गातून प्रतिनिधी व उपप्रतिनिधी निवडून दिला.

तर प्रतिनिधी मार्फत शाळेच्या जी एस व एल आर यांची निवड करण्यात आली त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून कु.पृथ्वीराज जबडे याची जनरल सेक्रेटरीपदी तर कु काव्यांजली चौगुले हिची विद्यर्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटामधून कु सोहम शिंदे याची जनरल सेक्रेटरी पदी तर कु श्रेयशी चौगुले हिची विद्यर्थिनी प्रतिनिधी पदावर निवड झाली. सदर निवडणुकीसाठी मुख्याध्यापक श्रीमती एस एम गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले तर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले. निवडणूक संपन्न करण्या कामी श्री आर एस भोसले,श्री आर डी देसाई,श्री ए एच आळवे, श्रीमती व्ही व्ही पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष श्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!