आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा उत्साहात!

चिमुकल्या मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (16)

बेळगाव मराठा मंडळ संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. श्री विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, तुकाराम, पुंडलिक, वासुदेव, गोरखानाथ, वारकरी मंडळी, चिमुकल्या मुलींनी तर नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या. अशा विविध वेशभूषा व विठ्ठल नामाचा जप करीत दिंडी प्रथम एम. इ. एस.शाळेतून विठू नामाच्या गजरात ही दिंडी नगरपालिकेच्या मार्गातून मंगळवार पेठ येथे असणाऱ्या महादेव मंदिरामध्ये असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन दिंडी पुन्हा शाळेकडे आली.

प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे यांनी अन्नदाता शेतकरी, वारकरी, तुळस, उपवास आणि एकादशीचे महत्त्व स्पष्ट केले आणि तुळशीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर समाजशास्त्राच्या शिक्षिका श्रीमती के. एस. मेणसे आणि श्रीमती डी पी पाटील यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रौढ शाळेच्या विद्यार्थिनीं लेझीम, फुगडी, लाठी काठी अशी विविध कौशल्ये सादर केली. सर्व शिक्षकांनी मुलांच्या कडून भजन म्हणून घेतले. विठ्ठल नामाचा जयघोष केला. दिंडीचे मुख्य आकर्षण बैलगाडी मधून जाणारे वारकरी, पालखी मिरवणूक, लेझीम हे नयन मनोहारी दृश्य सर्व निपाणी करांचे लक्ष वेधून घेतले. ‘विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली’ या भजन गीताप्रमाणे दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, भजनी मंडळी, शिक्षक वर्ग अगदी तल्लीन होऊन गेली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!