आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मराठा मंडळ शाळेमध्ये आषाढी एकादशीला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा.!

विठ्ठलाच्या पालखीचे पूजन कदम परिवाराच्या हस्ते करण्यात आले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा मराठा मंडळ साखरवाडी निपाणी येथे आयोजित करण्यात आलेला होता.

यामध्ये प्रथम विठ्ठलाच्या पालखीचे पूजन मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष- श्री रविंद्र कदम, संगीता कदम, मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन- राजेश कदम, ज्योती कदम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पालखी पूजनाच्या वेळी माजी नगरसेवक संदीप चावरेकर , हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी हळवणकर प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पालखीचे पूजन झाल्यानंतर पायी दिंडी मराठा मंडळ कडून  मंगळवार पेठ मार्गे- निपाणी नगरपालिका – पी.बी रोड- साखरवाडी मार्गे-संभाजी राजे चौक- बस स्टॅन्ड- कडून परत-साखरवाडी मार्गे मराठा मंडळ अशी पायी दिंडीचा मार्ग होता.

आज आषाढी एकादशी दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून संततदार पाऊस सुरूच होता. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने टाळ- चिपळ्यांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी दिंडीला सुरुवात केली. खरोखर पंढरपूरच्या दिंडीचे स्वरूप या विद्यार्थ्यांनी निपाणी नगरीमध्ये दाखवले.

काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी चा पोशाख धारण केला होता. तर अन्य काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, मुक्ताई या संत मंडळींचा वेश परिधान केला होता.

संततधार पाऊस असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी जणू काही आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत याचा भाव मनी धरून आपली दिंडी पूर्ण केली. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी यात्रा ही पंढरपुरा मध्ये होते. आज लाखो भावीक पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत. परंतु आमच्या या चिमुकल्या वारकऱ्यांनी पावसामध्ये एक छोटी दिंडी पूर्ण केली. अक्षरश: दोन मिनिटे का होईना प्रत्यक्ष पांडुरंग निपाणी मध्ये येऊन या विद्यार्थ्यांना भेट दिला असेल. अशी या विद्यार्थ्यांनी मनोभावे अभंग टाळ चिपळ्यांच्या गजरात दिंडी पूर्ण केली. अशी भावना मराठा मंडळाच्या ज्येष्ठ शिक्षिका खराडे यांनी दिली.

या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांना पी.बी रोडवरून जात असताना वाहनांचा अडथळा निर्माण होत होता त्यावेळी टाऊन पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय उमादेवी यांनी विशेष सहकार्य केले. पी.बी. रोडवरील संपूर्ण दिंडी पूर्ण होईपर्यंत पी.एस.आय  दिंडी सोबतच राहिल्या. त्यांचे मराठा मंडळ कडून विशेष आभार मानण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!