आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

श्री विठ्ठल मंदिर, निपाणी येथे आषाढी उत्सव सोहळा संपन्न

मंगळवार दि. 16 रोजी कस्तुरबा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीने मंदिर परिसरातील सर्वांचे लक्ष वेधले होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे आज आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे चार ते सहा काकड आरती त्यानंतर पहाटे सहा ते सात श्रींच्या मूर्तीस अभिषेक श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार दाम्पत्य व श्री नारायण कृष्णा मोरे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सकाळी सात ते आठ पूजा व महाआरती संपन्न झाली. सकाळी आठ ते नऊ या वेळेत पालखी व दिंडी प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात झाली. सकाळी नऊ पासून संपूर्ण दिवस असंख्य भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत विविध भजनी मंडळांनी भजन सेवा केली. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ व त्यानंतर आरती झाली. सायंकाळी सात ते रात्री दहा हरीजागराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आकर्षक सजावटीसह नेटके नियोजन करून धार्मिक वातावरणात संपूर्ण सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रम विठोबा देव फाउंडेशनच्या नेतृत्वात पार पडला. नव्याने स्थापन झालेल्या माऊली युवक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. तत्पूर्वी दि. 16 रोजी कस्तुरबा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीने मंदिर परिसरातील सर्वांचे लक्ष वेधले.

श्री विठ्ठल मंदिर येथे प्रत्येक एकादशीला सकाळी सहा ते नऊ या वेळेत अभिषेक, भजन, आरती व त्यानंतर प्रसाद वाटप असे आयोजन करण्यात येते.

निपाणीतील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक असणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन विठोबा देव फाउंडेशनचे अध्यक्ष ह भ प बाबुराव महाजन महाराज यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!