आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

राज्यस्तरीय मिनी ओलंपिक तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड!

या स्पर्धा "स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटका, गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका, कर्नाटक ऑलम्पिक असोसिएशन यांच्याकडून आयोजित करण्यात आल्या आहेत!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

बेंगलोर येथे होणाऱ्या 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तायक्वांदो या क्रीडा प्रकारामध्ये तिसऱ्या राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थिनीची निवड झाली. या स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटका, गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका, कर्नाटक ऑलम्पिक असोसिएशन यांच्याकडून आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मध्ये 34 किलो आतील गटात सोनल लिगाडे, 53 किलो आतील गटात सौम्य खोत, तर 53 किलो वरील गटात अफ्राह पठाण या विद्यार्थिनींची निवड झाली.

निवड प्रसंगी बेळगाव जिल्ह्यातून निपाणी, चिकोडी, संकेश्वर, रायबाग,अथणी, काकती येथून 120 मुला मुलींनी सहभाग घेतला होता निवड प्रसंगी बेळगाव जिल्हा तायक्वांदो क्रीडा संघाचे अध्यक्ष विजय बजत्री, सेक्रेटरी बबन निर्मले, उपाध्यक्ष अनिल कोरवी, खजिनदार प्रवीण पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून प्रशिक्षक महेश ठोंबरे, विनायक केसरकर ,विजय नाईक, प्रथमेश भोसले, देवदत्त मल्लाडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशस्वी विद्यार्थिनींना तायक्वांदो प्रशिक्षक श्री बबन निर्मल यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर डॉ. विवेक सोलापूरकर यांचे प्रोत्साहन लाभले.  यशस्वी विद्यार्थिनींचे निपाणी आणि परिसरातून कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!