आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयाचा पायी दिंडी सोहळा संपन्न!

कोडणी येथील श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिर येथे दिंडीचे भव्य स्वागत!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी अर्जुननगर,(17 )

देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथील कनिष्ठ विभागामार्फत आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही पायी दिंडी देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथून कोडणी येथील विठ्ठल मंदिरापर्यंत तसेच कोडणी विठ्ठल मंदिर ते देवचंद महाविद्यालय अर्जुननगर अशी पायी चालत संपन्न झाली. यामध्ये पालखी पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी डी इंगळे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी प्राचार्यांनी या सांस्कृतिक वारसांचा आढावा घेऊन आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले. त्यानंतर पालखीचे प्रस्थान कोडणी कडे झाले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संगीता जाधव, पर्यवेक्षक डॉ.अशोक डोनर, एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी विष्णू पाटील तसेच सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्रा.नितीन कोले व सदस्य प्रा विनायक कुंभार , प्रा. कृष्णामाई कुंभार , प्रा राणी सोकासने, प्रा. शीतल चिवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होता .श्री अनंत घोळवी यांनी पंचपदीने भजनाला सुरुवात केली. पायी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे प्रबोधन ,सांस्कृतिक वारसा आणि वारीचे महत्त्व सांगणाऱ्या फलकाद्वारे जनजागृती केली . ही पायी दिंडी यशस्वी होण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह , उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार सुबोधभाई शहा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांनी पायी दिंडी यशस्वी होण्यासाठी व शिस्त राखण्यास मदत केली.या दिंडीमध्ये कोडणी ग्रामपंचायत,विठ्ठल मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन मदत केली. या पायी दिंडी साठी 550 विद्यार्थी उपस्थित होते. पायी दिंडी साठी लागणाऱ्या  पालखीचे सहकार्य श्रीराम मंदिर ट्रस्ट निपाणी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!