आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी नगरीच्या चौथ्या विशेषांक सोहळ्यास अनेक मान्यवरांची मांदियाळी!

निपाणी येथील संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स येथे नवीन वास्तूत निपाणी नगरी कार्यालयाचे स्थलांतर!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी. कॉम या डिजिटल वेब पोर्टलचा चौथा वर्धापन दिन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काल 20 जुलै 2024 रोजी उत्साहात संपन्न.

अल्पावधीतच डिजिटल वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे, सामाजिक प्रश्नावर अनेक वेळा कायदेशीर भाष्य करणारे व मागील चार वर्षापासून सतत कार्यरत राहणाऱ्या निपाणी नगरी या डिजिटल वेब पोर्टलची भरारी वाखाणण्याजोगी आहे, बघता बघता या डिजिटल पत्रिकेने नैसर्गिक दहा लाखाचा डिजिटल वाचकवर्ग निर्माण केला असून. एवढ्या अल्प कालावधीमध्ये एवढा मोठा गोतावळा जमवणे सोपी गोष्ट नाही. या परिवाराकडून आजपर्यंत अनेक लोकांना न्याय मिळवून देऊन त्यांचे जीवन सुखकर केले असून भविष्यात देखील निपाणी नगरी परिवाराकडून असेच समाज उपयोगी काम घडो अशी सदिच्छा काल निपाणी विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्राणलिंग स्वामीजीनी व्यक्त केले.

ते काल निपाणी नगरीच्या चौथ्या वर्धापन दिन विशेषांकाचे अनावरण करताना बोलत होते. प्रारंभी स्वामीजींच्या दिव्य सानिध्यामध्ये व रतुजा डेव्हलपर्सचे पार्टनर श्री शशी देसाई व प्रवीता देसाई यांच्या विशेष उपस्थितीमध्ये निपाणी नगरीच्या नवीन वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. 

पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आज सर्वत्र माध्यम स्वातंत्र्याचे पतन होत असून यामध्ये देखील आपला एक वेगळा ठसा उमटवण्यास व सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यास हे डिजिटल वेब पोर्टल कमालीचे यशस्वी झाले असून डिजिटल वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशा या डिजिटल पत्रिकेस आम्हा सर्व उपस्थितांचे नेहमीच मार्गदर्शन लाभणार असून त्यांनी आपली डिजिटल लेखनी अशीच चालू ठेवावी. असे  गौरवोद्गार काढले.

गेली चार वर्षे अविरतपणे निपाणी नगरीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे  श्री नामदेव चौगुले सर यांनी उपस्थित सर्वांना गुलाब पुष्पाचे वाटप केले. तर निपाणी बसस्टँडमधील नंदिनी दुध केंद्राकडून कार्यक्रमास चहा बिस्कीटाची सोय केली होती. फोनवरून आलेले मान्यवरांचे शुभेच्छा संदेश सुनील कांबळे यांनी वाचून दाखवले. 

चौथ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सकाळपासूनच फोनवरून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, व्यंकटेश्वरा साखर कारखाना कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, युवा नेते उत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, डॉ. सी बी कुरबेट्टी, अजित सगरे, प्रसन्नकुमार गुजर यांनी शुभेच्छा दिल्या.

विशेषांक प्रकाशन सोहळ्यास जोल्ले उद्योग समूह एकसंबा आशाज्योती शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्ले (गुड्डू भैया) विद्यमान नगरसेवक व माजी सभापती राजगुंदेशा, निपाणी टाऊन प्लॅनिंग अथोरिटीचे चेअरमन निकुआण्णा पाटील, संत बाबा महाराज चव्हाण घराण्याचे वारसदार पृथ्वीराज हरिभाऊ चव्हाण,महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी युवा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, शुभरत्न केंद्र निपाणीचे रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला, माजी नगरसेवक दत्ता जोत्रे, महादेव चव्हाण, प्रशांत केस्ती, निपाणी सीमाभाग चळवळीतील ज्येष्ठ डॉ. एन डी जत्राटकर, नानासाहेब जामदार सर, धर्मप्रेमी अभिनंदन भोसले, अजित पारळे, सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे बबन निर्मले, विज्ञानप्रेमी बाबासाहेब मगदूम, जायंट्स ग्रुप अध्यक्ष रणजीत मगदूम, दि निपाणी को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटचे विद्यमान संचालक सुधाकर थोरात, सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम, बबलू शितोळे, दै. लोकमतचे पत्रकार दादासाहेब जनवाडे,नंदकुमार चेंडके, श्री जोके, मोहनलाल दोशी विद्यालय मराठी कॉन्व्हेन्ट स्कूल निपाणीचे मुख्याध्यापक संतोष कांबळे, रमेश कांबळे,जालिंदर डाफळे, दीपक जाधव, हेमंत कोरवी, निपाणी तालुका मीडिया क्लबचे अध्यक्ष गौतम जाधव, सेक्रेटरी संतोष मातीवड्डर, कार्यदर्शी चेतन सनदी, संजय कांबळे, सुनील वारके, सिकंदर माळकर, विजयकुमार बुरुड, अमर गुरव, मधुसूदन नलवडे, आनंदा जाधव, शुभम जाधव, वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री, आनंद संकपाळ, सागर श्रीखंडे, रोहन राऊत,  वर्गमित्र संजय बगाडे, रावसाहेब निकम, जयसिंग पाटील, संदीप पाटील, यांच्यासह निपाणी व परिसरातील अनेक डॉक्टर्स, उद्योजक, हितचिंतक, जाहिरातदार, यांची उपस्थिती लक्षणीय होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार चेतन सनदी यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!