आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कोगनोळी सैनिकी शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी!

अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते .तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील ,उपाध्यक्ष अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अजित पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन देण्यात आले . नंतर उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला . यावेळी शाळेचे शिक्षक  किरण संकपाळ यांनी आपल्या मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य हे जनसामान्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले . यानंतर अध्यक्ष  संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक जीवनाचे दर्शन घडविले आहे हे सांगताना त्यांनी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.

यावेळी अनिस मुल्ला ,विनायक कांबळे, संदीप कुराडे ,शिवानंद ऐवाळे, श्रीनिवास नलवडे ,अभिनव नाईक, तुषार पवार, सचिन बेलेकर, साधना मधाळे ,आरती कारागीर ,वर्षा केनवडे ,स्नेहल बेलेकर, वर्षा कांबळे ,मनीषा मडिवाळ यांच्यासह इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी यांनी केले तर आभार रूपा खोत यांनी मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!