आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीकरांना स्वच्छ प्रशासनाची तहसीलदारांकडून ग्वाही!

नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी पदभार स्वीकारला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

निपाणी तालुक्यात यापूर्वी आपण अनेक विभागांमध्ये काम केले असून निपाणी व परिसरातील आर्थिक मागास, गोरगरीब व दिन दलित जनतेच्या अडीअडचणीची आम्हास पूर्ण जाण असून निपाणीकरांना प्रशासनाकडून स्वच्छ कारभार देण्याची ग्वाही काल नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. यापूर्वी निपाणी तालुक्यात आपण तहसीलदार पदी सेवा बजावली असून दुसऱ्यांदा या पदावर येण्याचा सन्मान आपल्याला मिळाला आहे. तहसील प्रशासना बाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी येणार नाहीत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी पुढे सांगितले. काल गुरुवारी (ता. 1) कारंडे यांनी येथील तहसील कार्यालयाच्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते.

बुधवारी (ता. 31) रात्री उशिरा कारंडे यांच्या नियुक्तीचे पत्र मिळाले होते. कारंडे निपाणीत रुजू झाल्याने आज तहसीलदार एम. एन. बळीगार यांच्याकडून तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला. 

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी कारंडे यांची निपाणीसाठी बदली झाली होती. तशी ऑर्डर झाली होती, पण त्यानंतर ही बदली स्थगित ठेवली होती. कारंडे हे कुमठा (जि. कारवार) येथे तहसीलदार म्हणून सेवेत होते. मुळचे निपाणीचे असणाऱ्या प्रवीण कारंडे यांनी यापूर्वी निपाणी तहसील कार्यालयात ग्रेड-1 तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे. ग्रामपंचायत सचिव पदापासून वरिष्ठ लिपिक, शिरस्तेदार, उप तहसीलदार, ग्रेड-2 तहसीलदार अशा विविध पदावर काम केले आहे.

 कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कारंडे यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार कारंडे यांनी लोकाभिमुख सेवेसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले.व जनतेच्या तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्याचे देखील आश्वासन दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!