आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शेंडुर ग्रामपंचायतीत 29 प्लॉट धारकांची फसवणूक?

न्याय न मिळाल्यास प्लॉटधारकांचा पंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्धार

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (1)

शेंडूर ग्रामपंचायत मध्ये खोटी कागदपत्रे बनवून 29 प्लॉट धारकांची फसवणूक, झाल्याचा आरोप आज शेंडूर ग्रामपंचायत परिसरामध्ये ग्रामस्थांनी केला.

आम्हाला लवकरच योग्य कागदपत्रे न मिळाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा प्लॉट धारकांनी केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या व प्लॉट धारकांच्या माहितीनुसार निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे मुकुंद नारायण कुलकर्णी यांची 29 गुंठे जमीन होती. सर्वे नंबर 110 -1 (A) व 110 (B) प्रमाणे कुलकर्णी हयात असताना प्लॉट पाडून गावातील 29 जणांना प्लॉटची विक्री केली होती. मात्र सध्या ग्रामपंचायतीने दोन नंबरची डायरी घालून सदर 29 गुंठे जमीन आनंदा जानू दामोडे यांच्या नावावर दाखविली आहे असा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती 29 प्लॉट धारकांना समजल्या नंतर संबंधित प्लॉट धारकांनी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडे उतारा, डायरी उतारा व हस्ताक्षर उतारा, देण्याची मागणी केली. पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. वर्दी देण्यास नऊ महिन्यापासून टाळाटाळ केली आहे. कोर्टाकडून जमीन संबंधित 29 प्लॉट धारकांची आहे. असा निकाल दिल्यानंतरही आपल्या कागदपत्रांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विचार न केल्याने संतापलेल्या प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतीला सात दिवसाचा अवधी देऊन कागदपत्रे न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा सर्व 29 प्लॉट धारकांच्या वतीने पांडुरंग तोडकर यांनी दिला आहे.

या प्रकरणात माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, कम्प्युटर ऑपरेटर यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून जमीन दामोडेच्या नावावर दाखविली आहे. तरी या सर्व प्रकरणाचा व्यवस्थित तपास करून योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीला केल्याचे प्लॉट धारकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले .

याप्रसंगी महादेव तोडकर, संजय अंबोले, सूर्यकांत तोडकर, शंकर तोंदले , शिवाजी पोवार, चंद्रकांत तोडकर, सुनिल होरमाळे, गोपाल सूर्यवंशी, यांचासह सर्व प्लॉटधारकांची  उपस्थिती होती.


माझ्यावरील सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे:-बाजीराव भोसले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शेंडुर….. 

सदर जमीनी संदर्भात धारवाड कोर्टामध्ये केस चालू असून हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. 1972 पासून कुलकर्णी यांच्या नावावर होती व कुळ कायद्याने ही जमीन आनंदा दामोडे यांच्या वडिलांच्या नावावर झाली होती. त्याच कागदपत्राच्या आधारे 2004 साली आनंदा दामोडे यांनी आपल्या नावावर करून घेतली आहे. या संदर्भातील कोणताही पत्रव्यवहार शेंडूर ग्रामपंचायती तर्फे आमच्या काळात झालेला नसून माझ्यावर झालेले आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याचे सांगितले. आणि या कागदपत्रात काही तथ्य असल्यास कायदेशीर कारवाई करण्यास प्लॉटधारकांना  मुभा असल्याचे सांगितले.


सदरचा व्यवहार प्रशासकीय काळात झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप…

जो काही गैरप्रकार घडवून आणून 29 प्लॉट धारकांना बेदखल करण्यात येत आहे. तो सर्व मलईयुक्त व्यवहार प्रशासकीय काळात घडवून आणल्याचा आरोप प्लॉट धारक करत असून, ग्रामपंचायत रजिस्टर मध्ये म्हणजेच प्रोसिडिंग बुक मध्ये गाळलेल्या जागा भरून ठराव पूर्ण केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!