आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सैनिकी शाळेची विद्यार्थिनी रचना कांबळे हिचा वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक!

वकृत्व स्पर्धेतील खुल्या गटांमध्ये कॉलेजच्या तीन्हीही मुलींचा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा संकुलामार्फत सत्कार करण्यात आला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त कसबा सांगाव येथे घेण्यात आलेल्या खुल्या वकृत्व स्पर्धेमध्ये कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज आणि युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी निवासी संकुलातील बारावी सायन्स विभागातील रचना कांबळे हिने वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच संस्कृती आवळे द्वितीय क्रमांक तर स्नेहल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावून उज्वल यश संपादन केले आहे.

वकृत्व स्पर्धेतील खुल्या गटांमध्ये कॉलेजच्या तीन्हीही मुलींचा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा संकुलामार्फत सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनींना प्रज्ञा माने, त्रिशेला दत्तवाडे ,सचिन बेलेकर, संदीप कुराडे ,तुषार पवार या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले . तसेच मुख्याध्यापक अनमोल पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल पाटील, संस्थेचे सचिव कुमार पाटील व अध्यक्षा रेखा पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

यावेळी संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी बोलताना विद्यार्थ्यिनीनी मिळवलेले हे यश खूपच प्रेरणादायी आहे. अशा मुलींचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. सांस्कृतिक गुणांना वाव दिल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते.  यासाठी शालेय अंतर्गत अथवा शाळा बाह्य स्पर्धेतील उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान व्यक्त केले . यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!