आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा सन २०२४-२०२५ देवचंद कॉलेज,अर्जुननगर येथे उत्साहात संपन्न झाल्या!

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी निपाणी टाऊनच्या पी.एस.आय उमादेवी गौडा होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516

निपाणी नगरी प्रतिनिधी (9) अर्जुननगर

जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व कागल तालुका आयोजित शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा सन २०२४-२०२५ देवचंद कॉलेज,अर्जुननगर येथे उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी निपाणी शहर शहर पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय उमादेवी गौडा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी.डी.इंगळे, उप-प्राचार्या सौ.एस.पी.जाधव, पर्यवेक्षक प्रा. डॉ. ए. एस. डोनर, कागल शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष के.बी.चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये…

१४ वर्षा खालील स्पर्धेमध्ये इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल,बोरवडे ने २-० गोलने स्व.सौ.शिवाजी पाटील माध्य.विद्या.मौजे सांगाव संघावर मात केली.

१७ वर्ष खालील स्पर्धेमध्ये हॉलिडन इंग्लिश स्कूल,कागल ने १-० गोलने इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल,बोरवडे संघावर मात केली.

१९ वर्ष खालील स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज,अर्जुननगर ने १-० गोलने डी.आर.माने.महाविद्यालय, कागल संघावर मात केली.

सर्व विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून त्या स्पर्धा ३ ते ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहेत. स्पर्धा पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह ,महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. जी.डी.इंगळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य सौ एस.पी.जाधव ,पर्यवेक्षक प्रा.डॉ ए.एस.डोनर ,जिमखाना प्रमुख प्रा.आर. जी. चव्हाण, क्रीडा शिक्षक  व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!