आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न शाळेच्या विद्यार्थिनींचे उत्कृष्ट काम, पाठवल्या भारतीय सैन्यांना राख्या!

मॉडर्न इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगर प्रतिनिधी (12) निपाणी

बेळगाव मराठा मंडळ संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी या शाळेच्या विद्यार्थिनींनी रंगीबिरंगी राख्या व शुभेच्छापत्रे बनवून भारतीय सैन्यदलात तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैन्य बांधवांना, भारतीय टपाल कचेरी सेवेच्या माध्यमातून पाठविल्या.

आपला भारतीय सण हा वेगवेगळ्या सण आणि संस्कृतीने नटलेला आहे. तर पूर्ण भारतभरात आता रक्षाबंधनाच्या सणाची चाहूल लागलेली असतानाच मॉडर्न इंग्लिश शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या भारतीय सैन्य बांधवांचा विचार केला की, आपले सैन्य बांधव हे आपल्या रक्षणासाठी 24 तास सीमेवर तैनात असतात तर हा सण साजरा करण्यासाठी त्यांना आपल्या गावी जाणं अशक्य असतं, म्हणून त्यांच्यासाठी आपलेही काही कर्तव्य आहे ही जाण ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.

मॉडर्न इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागार्जुन, शाळेच्या प्राचार्या सौ‌ स्नेहा आर घाटगे  सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग मिळाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!