आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

उद्या 15 ऑगस्ट रोजी “फ्रीडम राईड”चे आयोजन!

हेल्मेट जनजागृती फेरीसह, निपाणी रायडर्स क्लब तर्फे प्रति वर्षाप्रमाणे नेटके नियोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (13)

भारतीय स्वातंत्र्याच्या 78 वा स्वातंत्र्य दिन उद्या अखंड हिंदुस्तानात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होणार असून निपाणीकरांसाठी देखील निपाणी रायडर्स क्लब तर्फे विशेष फ्रीडम राईड चे आयोजन केले आहे.

आपण दररोज अनेक ठिकाणी पाहतो किंवा वाचतो की हेल्मेट परिधान केले असते तर किंवा रस्त्यावरील सुरक्षा पाळली असती तर अनेक अपघात टाळता आले असते हाच धागा पकडून निपाणी रायडर्स क्लब तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील हेल्मेट जनजागृती फेरी व रस्ता सुरक्षा म्हणजेच फ्रीडम राईड चे आयोजन केले असून सदरची फ्रीडम राईड निपाणी व्ही एस.एम अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सकाळी 11 नंतर सुरुवात होऊन कोगनोळी येथील विराज जंक्शन येथे फ्रीडम राईड ची सांगता होईल.

 

या फ्रीडम राईडच्या आयोजनात भाग घेण्यासाठी प्रत्येक रायडर्सचे रजिस्ट्रेशन होणे गरजेचे असून नाममात्र 49 रुपयांमध्ये आपले रजिस्ट्रेशन करता येईल या रजिस्ट्रेशन फी मध्ये प्रत्येक रायडर्स साठी ब्रेकफास्ट ची सुविधा निपाणी रायडर्स क्लब तर्फे करण्यात येत असून या आयोजना मध्ये भाग घेण्यासाठी हेल्मेट व शूज अनिवार्य असून हे परिधान न केलेल्या रायडर्सला राईड मध्ये भाग घेता येणार नाही.

मागील वर्षी देखील निपाणी रायडर्स क्लब तर्फे या फेरीचे आयोजन केले होते व याला सर्व निपाणी व परिसरातील रायडर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यावेळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून  रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन निपाणी रायडर्स क्लबचे अध्यक्ष आकाश भोसले यांनी केले असून खालील नंबर वर आपल्या रजिस्ट्रेशन आपण करू शकता.

8904690007

8123117711

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!