आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

जिवलग मित्राला वाचवण्यासाठी सवंगड्यांची होतेय घालमेल!

भिशी, खाऊचे पैसे मित्राच्या उपचाराला दिले, दानशूर लोकांनी पुढे येण्याची गरज!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (14) नांगनूर

धिरज धनंजय हजारे, श्रीपेवाडी येथील संकपाळ हायस्कूलमध्ये दहावीचा विद्यार्थी. रोजच खेळणं, शाळेला जाणं, अभ्यास करणे या गोष्टी नेहमीच सुरू होत्या. अचानक तब्येत बिघडली. सुरुवातीला ताप आल्याचे निमित झालं आणि मग डेंग्यू, मेंदूत रक्तस्त्राव आणि निमोनिया या आजाराने त्याला घेरलं. आणि चालता बोलता धीरज आयसीयूमध्ये ऍडमिट झाला. आपला विद्यार्थी आपला मित्र मृत्यूशी झुंज देत आहे या माहितीने कासावीस झालेल्या अनेकांनी मदत सुरू केली. कोणी खाऊचे पैसे दिले, शिक्षकांनी पैसे दिले, गावातल्या नागरिकांनी सर्वोतोपरी मदत केली. आणि दोन लाखांवर मदत गोळा झाली. पण अजूनही धीरज आयुसीयुमध्येच आहे. निपाणी तालुक्यातील नागनूर येथील धीरज धनंजय हजारे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर ही वाईट वेळ आली आहे. धिरजचे वडील धनंजय व आई नीता ही मोलमजुरी करून आपले घर चालवतात. यातूनच त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यामुळे धीरज हा सध्या संकपाळ हायस्कूल येथे दहावीचे शिक्षण घेत आहे. अतिशय होतकरू, हुशार असल्याने तो शिक्षकांचा लाडका आहे. आपला विद्यार्थी अचानक आजारी पडला आणि थेट आयसियुमध्ये ऍडमिट झाला. या घटनेनंतर सगळ्यांचीच घालमेल सुरू झाली. आपला मित्र मृत्यूशी झुंजत आहे. या एका बातमीने कासावीस झालेल्या वर्ग मित्रांनी गावभर मदत गोळा करायला सुरुवात केली. गावातल्या सर्व क्षेत्रातील माणसांनी मदत केली. शाळेतल्या मुलांनी शाळेच्या खाऊचे पैसे दिले. काही विद्यार्थ्यांनी घरातल्या भिशा फोडल्या आणि तब्बल दोन लाखांवर मदत ही धीरज साठी जमा झाली. संकपाळ हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांनी सर्वतोपरी मदत केली. शक्य त्या ठिकाणी फोन केले. व सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहान केलं. आणि यातून ही रक्कम उभी राहिली. पण अजूनही धीरजच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही.

शाळेत रोज प्रार्थना, उपचार सुरू असून सुद्धा धिरजच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. यामुळे शाळेच्या रोजच्या प्रार्थनेत सुद्धा धीरजसाठी प्रार्थना होत आहे. चिमुकले मित्र, शिक्षक हतबल होऊन प्रयत्न करत आहेत. आता समाजातील दानशुरानी मदतीसाठी पुढे यावे हीच इच्छा आहे. 


मदतीसाठी गुगल पे किंवा फोन पे

Shri B H Patil 97657871762

Vinayak Budihale 8495014918

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!