आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कोलकत्यातील घटनेच्या निषेधार्थ निपाणीतील डॉक्टरांचे तहसीलदारांना निवेदन!

काल मूकमोर्च्या द्वारे केला, निषेध व्यक्त!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (17)

कोलकत्यात घडलेल्या एका महिला डॉक्टर वरील अत्याचार व हत्येच्या  निषेधार्थ काल निपाणीतील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी मूक मोर्च्याद्वारे तहसीलदारांना दिले निवेदन.

प्रथम सकाळी सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन निपाणी आय एम ए हॉलमध्ये पीडित महिलेच्या प्रित्यर्थ दोन मिनिटे मौन धारण करून आपल्या मूक मोर्चाचा  उद्देश स्पष्ट करून सुरुवात केली. मोर्चा आय एम ए हॉल जवळून सुरुवात होऊन तिथून पुढे हेस्कॉम कार्यालयापासून चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक मार्गे नगरपालीके पासून येऊन तहसीलदार ऑफिस जवळ मूक मोर्चाची सांगता करण्यात आली. मूक मोर्चा मध्ये निपाणी व परिसरातील शेकडो डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

तहसीलदारांना निवेदन देताना डॉ. राजेश बणवन्ना, डॉ. सी बी कुरबेट्टी, प्रा. कांचन बिरनाळे पाटील, सामाजिक कार्यकर्ते जुबेर बागवान यांनी कोलकत्यातील घटने संदर्भात आपले परखड मत व्यक्त करून अशी समाज विघातक घटना घडल्यास एकजुटीने मुकाबला करून पिडीतांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुतोवाच केले.

तसेच या घटणे संदर्भात निपाणी व परिसरातील सर्व दवाखाने शनिवार 17 पासून सकाळी 6 वाजले पासून रविवार 18 तारखेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील अशी माहितीही काल एका पत्रकाद्वारे आय एम ए  निपाणी ब्रांच कडून सांगण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!