आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मध्ये आज दीड लाखाच्या दहीहंडीचा थरार!

दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, व हेल्थ क्लब तर्फे आयोजित!

Kiran G.Patil M.No.8884357516


येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवा शक्ती संघटनेच्या वतीने आज शुक्रवार दुपारी पाच वाजता निपाणी मुन्सिपल हायस्कूलच्या  मैदानावर दीड लाख रुपयांच्या दहीहंडीचा थरार आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक व निपाणी टॉम प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित ऊर्फ निकु पाटील यांनी दिली. 

विजेत्या संघाला 1 लाख 51 हजार रुपयाची बक्षीस दिले जाणार आहे स्पर्धेत सहभागी होऊन कमीत कमी पाच थर  लावणाऱ्या प्रत्येक संघाला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी पंधरा संघांना निमंत्रित करण्यात आले असून 11 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कार्यक्रमात महावीर आरोग्य सेवा संघातर्फे आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.

यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील राहुल जारकीहोळी,माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील प्राध्यापक सुभाष जोशी युवा नेते व सहकाररत्न  उत्तम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!