आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ.अपूर्वा (रतन वास्कर)चौगुले यांचेकडून यरनाळ येथील श्री.महादेव मंदिर,श्री.संत ज्ञानेश्वर मंदिर व श्री.गणेश मंदिरांना रु.78000/- ची देणगी!

मंदिर समितीच्या वतीने केला सत्कार! परिसरातुन कौतुकाचा वर्षाव!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी(30)

येथील यरनाळ तालुका निपाणी मधील श्री.महादेव मंदिर, श्री.संत ज्ञानेश्वर मंदिर व श्री.गणेश मंदिर यास सौ.अपूर्वा (रतन वास्कर)चौगुले यांचेकडून तब्बल 78 हजाराची देणगी प्रधान. परिसरातून कौतुकाचा वर्षाव.या मंदिराचा वास्तुशांती,मूर्ती प्राणप्रतिष्ठा ,कलशारोहण व लोकार्पण सोहळा काल‌ सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न.

अपूर्वा नामदेव चौगुले (रतन वास्कर) ज्यांचे माहेर यरनाळ असून लहानपणापासून भक्तीची गोडी श्री विठ्ठल मंदिरातून निर्माण झाली . ज्ञानेश्वरी पारायणातून संस्कार मिळाले त्या संत ज्ञानेश्वर मंदिराची निर्मिती होताना आपले पती पर्यावरणप्रेमी, तंत्रस्नेही, विषय शिक्षक अर्जुनीचे श्री नामदेव चौगुले यांनी ही यथाशक्ती देणगी देण्याचा मानस व्यक्त करून रुपये 78000/- बांधकामासाठी आणि रु.5051 श्रीमहाप्रसादासाठी देऊन पुण्याईचे काम करताना स्व. आऊबाई व धोंडिबा वास्कर यांचे स्मरण केले.

आजोबांची इच्छा होती की मुलींनी शिकून मोठे व्हावे.एम.ए. इंग्रजी, एम.ए. इतिहास आणि बी.एड.करून विद्यामंदिर निपाणी सारख्या शाळेत इंग्रजी विषय शिक्षिका या पदावर कार्य करीत असून आजोबांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मिळाले.

चौगुले दाम्पत्यांचा मंदिर कमिटी कडून सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना सौ चौगुले म्हणाल्या देवाच्या कृपेनें खूप मिळाले असून, धार्मिक कार्यात खारीचा वाटा उचलण्याची सुवर्णसंधी मिळाली. असे प्रतिपादन केले.

त्यावेळी बोलताना ह.भ.प. श्री.निवृत्ती घाटगे म्हणाले, अपूर्वा चौगुले यांनी सुरवातीला देणगी देऊन आमच्या बांधकाम कार्याला गती दिली. त्यावेळी नामदेव चौगुले यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया होऊन ही इतकी रक्कम देणाऱ्या चौगुले दाम्पत्याचे कौतुक केले. गावातील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन मंदिर निर्मिती केल्याने आजचा दिवस पाहायला मिळाला. या मोठया कार्यात सहभागी होण्याचा मान आम्हा उभयंतास मिळाला.त्याबद्दल संयोजक मंडळाने आमचा यथोचित सत्कार केला.यावेळी निवृत्ती घाटगे,महादेव पोवार,महादेव संकपाळ,सौ.मीरा मोहिते, यांच्या हस्ते सन्मान करणेत आला.यावेळी रामचंद्र वास्कर,महादेव केसरकर,सुरेश घाटगे,पांडुरंग केसरकर,संदीप संकपाळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!