आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

श्री.चौंडेश्वरी देवराईचा हमिदवाडा येथे निर्मिती शुभारंभ कार्यक्रम!

वैकुंठवासी ह.भ.प. विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ पन्नास हजार रुपये किमतीची रोपे भेट, पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा कौतुकास्पद उपक्रम

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (31)

श्री.चौंडेश्वरी देवराई हमिदवाडा निर्मिती शुभारंभ वैकुंठवासी ह.भ.प. विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ पन्नास हजार रुपये किमतीची रोपे भेट पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा कौतुकास्पद उपक्रम

वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे फक्त विचार न मांडता प्रत्यक्षात कृतीत आणले.कार्यक्रमात स्वर्गीय वारकरी विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ आमचे परममित्र, अर्जुनी शाळेचे विषयशिक्षक ,पर्यावरणप्रेमी तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौगुले सरांनी 125 वृक्ष रोपांची अनोखी भेट देऊन एक नवा आदर्श दिला.

नामदेव चौगुले यांचे गोव्याचे मित्र प्रशांत केशव नाईक  यांचाही आज जन्मदिवस असून त्यांनी दहा हजार रुपयांची वृक्षरोपे चौंडेश्वरी देवराईस भेट दिली.

या कार्यक्रमास सृष्टी पर्यावरणवादी संघटना निपाणीचे प्रा.डॉ.अशोक डोनर, प्रा.शिवाजीराव मोरे, फिरोज चाऊस, नामदेव चौगुले सर्व सन्मानीय संचालक मंडळ,ग्रामपंचायत हमिदवाडा सरपंच,कृष्णात बुरटे,उपसरपंच उमेश डावरे, संदीप ठाणेकर,सर्व सदस्य, न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळेतील शिक्षक बंधुभगिनी ,सर्व विद्यार्थी,डॉ. खरबुडे, पांडुरंग गोरे ,रणजित गोरे बेलेवाडी या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली,आपली देवराई भविष्यात आपण आदर्श निर्मितीसाठी सर्वांचे सहकार्य घेऊन कार्य करूया अशी मान्यवरांकडून ग्वाही देण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!