आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

विद्यार्थ्यांना अधिक स्पर्धात्मक बनविणे काळाची गरज: प्रा.डॉ. महादेव देशमुख!

याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी.डी.इंगळे उपस्थित होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (31) अर्जुननगर

सध्याच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 द्वारे भारताच्या शैक्षणिक प्रणालीला अधिक स्पर्धात्मक बनविणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करणे हा शिवाजी विद्यापीठाचा हेतू असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख यांनी काल देवचंद कॉलेज, अर्जुननगर (निपाणी) येथे नवीन अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्र विषयाच्या कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी.डी.इंगळे,अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयवंत इंगळे व अर्थशास्त्र तज्ञ प्रा.डॉ. अनिलकुमार इंगळे उपस्थित होते.

प्रा.डॉ. देशमुख म्हणाले, अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल केल्याने विद्यार्थी भविष्याच्या आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतील. विद्यार्थ्यांना विषया व्यतिरिक्त ज्ञान संपादन होण्यासाठी बहुउद्देशीय घटक समाविष्ट केले असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यशाळेचे अध्यक्षीय भाषण करताना डॉ.जयवंत इंगळे म्हणाले, अर्थशास्त्रीय ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या सक्षम बनतात.त्याआधारे विद्यार्थ्यांना सेवा, उद्योग व इतर क्षेत्रात संधी मिळू शकतात.

या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती आणि सत्राध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. सचिन सरदेसाई, डॉ. प्रभाकर माने, डॉ. अनिल सत्रे लाभले. तर सत्राध्यक्ष म्हणून डॉ. मनोहर कोरे, डॉ. प्रकाश टोने, डॉ. मोहन सदामते, डॉ. संजय धोंडे, डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते.

समारोप सत्रात प्राचार्य डॉ.जी.डी.इंगळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व विशद करून आजच्या घडीला अर्थशास्त्र करिअरसाठी कसा उपयुक्त आहे याविषयी भाष्य केले.

सदरची कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष  श्री.आशीषभाई शाह आणि पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेचे उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभागा कडून करण्यात आले. प्रमुख सूत्रसंचालन प्रा.ज्योती बुवा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. संतोष यादव यांनी केले. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठाकडून सहकार्य मिळाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!