आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीतील दीड लाखांची दहीहंडी फोडली अजिंक्यतारा पथकाने!

सात थराची सलामी देत शिरोळच्या पथकाने रचला इतिहास!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (30)

गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिजबाला”म्हणत अनेक बालगोपालांनी अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये जो काय नृत्याचा ठेका धरला होता तो डोळ्याचं पारणं फेडणारा होता. निमित्त होते दिवंगत दौलतराव सोशल फाउंडेशन हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या ऐतिहासिक अशा दीड लाखाच्या दहीहंडी कार्यक्रमाचे.

अगदी दुपार पासून ‘गोविंदा रे गोपाला यशोदेचा कान्हा या व अशा गीतांचा’ गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून-मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री पार पडला. शिरोळ येथील अजिंक्यतारा गोविंदा पथकाने दोनवेळा सलामी देऊन सात थर रचून दहीहंडी फोडली. या पथकाला दीड लाख रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील होते. प्रारंभी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, राहुल जारकीहोळी व मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन व उ‌द्घाटन झाले. प्रदीप सातवेकर यांनी प्रास्ताविक केले.

या स्पर्धेसाठी १५ संघाना निमंत्रित करण्यात आले होते. प्रथम साखरवाडी येथील गोविंदा पथकाने मनोरे रचत सलामी दिली. यावेळी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपने सहा थर रचत सलामी दिली. पण त्यांना दहीहंडी पर्यंत पोहोचता आली नाही.

यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष व दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन हेल्थ क्लब व मळा ग्रुपचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, पैलवान अजित नाईक, अभिजित पाटील-बेनाडीकर, सुजय पाटील, प्रवीण भाटले, राजेंद्र वडर, चंद्रकांत जासूद, सुरेश घाटगे, नवनाथ चव्हाण, पंकज पाटील, रवींद्र श्रीखंडे, विश्वास पाटील, विजय शेटके, झाकीर कादरी यांच्यासह निपाणी व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!