आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

(Modern English School) मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निपाणी विभागीय स्तरावरील वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (31)

येथील बेळगाव मराठा मंडळ संचलित, मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी निपाणी विभागीय स्तरावरील वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातील वैयक्तिक स्पर्धेत 100 मी. शर्यत,200 मी.शर्यत स्पर्धेत संकल्प साळुंखे याने प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच 400 मी.शर्यत आदित्य खराडे- प्रथम, रिद्धी चौगुले 100 मी.शर्यत व उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक आणि संस्कृती खराडे 100 मी. शर्यत मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. तर बुद्धिबळ स्पर्धेत सौम्या करगुपी- प्रथम व स्वरा जाधव- हीने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर सांघिक क्रिडा प्रकारात व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

शाळेच्या प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे आणि क्रिडाशिक्षक श्री.एस. डी. पोवार व श्री. सुकुमार गोरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.सदर विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!