आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

आज ग्रामीण संस्कृती समाजमनात रुजवणे काळाची गरज – लक्ष्मीकांत पाटील

गणेशोत्सवानिमित्त दि.16 रोजी झिम्मा फुगडी, वेशभूषा व उखाणा स्पर्धेचे आयोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी ( 8)

आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनामध्ये आपण जीवन जगायचे राहून जात असून जीवनाचा खरा आनंद व आपली संस्कृती टिकवायची असेल तर पूर्वीच्या काळातील ग्रामीण भागातील जे सणसमारंभ साजरी होत होते. त्याचे मुळात वैशिष्ट्य असे होते की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करत आपले आयुष्य सुखकर करण्याचा एक मार्ग म्हणून प्रत्येक सणाकडे पाहिले पाहिजे अशीच काहीशी प्रेरणा घेत निपाणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी भिवशी येथील आपल्या हॉटेल परिसरामध्ये अनेक ग्रामीण खेळांचे आयोजन केले असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील हॉटेल येस राजवाडा यांच्या वतीने जपणूक परंपरेची व संस्कृतीची यांच्या सौजन्याने गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी दि. १२ पर्यंत ऑनलाईन घरगुती गौरी-गणपती सजावट, तर दि. १६ रोजी झिम्मा फुगडी, वेशभूषा व उखाणा स्पर्धा होणार आहेत.

झिम्मा फुगडी स्पर्धेसाठी अनुक्रमे रु. ५०००, ३०००, २००० तर फुगडी स्पर्धेसाठी १००१, ७०१, ५०१ वेशभूषा स्पर्धेसाठी २००१, १५०१, १००१ तर उखाणा स्पर्धेसाठी १००१, ७०१, ५०१ तसेच प्रत्येकी विजेत्याला प्रमाणपत्र व चषक दिला जाणार आहे. ऑनलाईन घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धाही होणार आहेत. गणपती सजावट स्पर्धेसाठी अनुक्रमे रुपये २५००,२०००, १५०० तर गौरी स्पर्धेसाठी २०००, १५००, १००० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक लाईक, शेअर व ह्युजसाठी प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी हॉटेलचे मालक लक्ष्मीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!