आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

कागल तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा दौलतराव निकम विद्यालय व्हन्नूर येथे संपन्न!

स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

कागल तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा दौलतराव निकम विद्यालय व्हन्नूर येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. 19 वर्षा खालील मुलांच्या स्पर्धेमध्ये स्वप्निल पाटील याने प्रथम क्रमांक तर हार्दिक पाटील यांनी पाचवा क्रमांक पटकावला 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेमध्ये वंदना मारुती चौगुले हिने प्रथम क्रमांक पटकावला, 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये हरीश पाटील याने द्वितीय, गणेश कुरले तृतीया व वेदांत आंबी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. या खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली असून त्यांना संस्थेचे अध्यक्ष  आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे उप- प्राचार्य डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाचे उप-प्राचार्य सौ. एस. पी.जाधव, पर्यवेक्षक डॉ ए.एस.डोनर, जिमखाना प्रमुख डॉ आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक निरंजन  जाधव, वैभव सोनार, शिवदास चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!