आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

श्री विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया – नामदेव चौगुले! 

लोकसह‌भागातून शंभर वृक्षरोपांची लागवड!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (18)

निपाणी लेटेक्स कॉलनी, आवटे प्लॉट निपाणी येथे श्री विश्वकर्मा उद्यान उद्‌घाटन सोहळा श्री विश्वकर्मा दिनी पार पडला. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे शुभहस्ते श्री विश्वकर्मा उद्यान फलकास पुष्पहार घालून अनावरण करणेत आले.

या उद्यानाचे नामदेव चौगुले व सहकारी वर्गाच्या अथक प्रयत्नातून दोन ते तीन महिन्यात उद्यानाची निर्मिती करणेत आली आहे. 15 एप्रिल रोजी या उद्यानात 25 वृक्षरोपे रोपे लावून शुभारंभ करणेत आला. त्यानंतर मनिषा मेहता गोरेगाव ,मुंबई यांच्या भगिनी कॅनडास्थित सपना तेंडोलकर यांच्या जन्मदिनी ही वृक्षारोपण  कार्यक्रम करण्यात आला.

सुधीरकुमार राऊत व सई राऊत तसेच माजी मुख्याध्यापक प्रकाश कडगावकर व क्षमा कडगावकर यांचे लग्नाचा वाढदिवस वृक्षरोपे लावून याच ठिकाणी साजरा केला तर .रणजीत गोरे इचलकरंजी अपूर्वा चौगुले, फिरोज चाऊस, डॉ. प्रशांत अथणी, संजय साळुंखे यांचे जन्मदिनी रोपांची लागवड करणेत आली. लोकसहभागातून 100 वृक्षरोपे लावून समाजाला एक नवा आदर्श दिला असून, वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय असून आपण प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. श्री विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया.असे नामदेव चौगुले यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले. यानंतर रविप्रसाद आवटे, यांचेही मनोगत झाले. याप्रसंगी , प्रकाश सुतार, रामचंद्र सुतार, संजय सुतार, अरुण सुतार,अरुण देसूरकर, अमोल सुतार, अनिल सुतार, सुखदेव सुतार, जोतिबा सुतार, दत्तात्रय लोहार, बाळासाहेब सुतार, ओंकार प्रभाकर सुतार ,सुतार, प्रथमेश सुतार, किरण सुतार, लखन बापू सुतार, विलास सुतार, किशोर सुतार, हरिबा सुतार, राजेंद्र सुतार, महादेव सुतार, रुपाली सुतार, सरिता सुतार, वासंती सुतार, श्रद्धा सुतार उपस्थितांचे आभार विश्वकर्मा अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष प्रकाश सुतार यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!