आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

पालिकेतील अनेक ठरावाच्या मंजुरीसह, “तू तू मै मै” करत सर्वसाधारण सभा संपन्न!

वाढीव पाणीपट्टीसाठी एकमत, स्थायी समिती निवड, गाळेधारकांना भाडेवाढ,

Kiran G.Patil M.No.8884357516


24 तास पाणी योजना पूर्णपणे कार्यान्वित नसताना देखील भरमसाठ वाऱ्यावर पाणी मीटर फिरून निपाणीतील नागरिकाचे कंबरडे मोडणाऱ्या जैन इरिगेशनविरुद्ध सर्व उपस्थित नगरसेवकांनी आवाज उठवत तुगलकी दर रद्द करून काही प्रमाणात वाढ सुचवत पालिकेची सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय देऊन नूतन नगराध्यक्षा काळातील पहिला महत्त्वकांक्षी निर्णय घेऊन पालिका सभा सुरू झाली.

प्रारंभी नगरपालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून भू-भाडे अकारण्याला स्थगिती देण्यात आली.

तत्पूर्वी, सर्वसाधारण सभे समोरील एकूण 30 विषयांची सूची सर्व सर्व नगरसेवकांना अगोदरच सुपूर्द केल्यामुळे आजच्या सभेसमोरील विषयी एका मागोमाग एक संमत करून किंवा चर्चा घडवत शाब्दिक चकमक उडत पारित करण्यात आले. त्यापैकी ऑगस्ट 2024 च्या जमाखर्च मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री नगरोस्थान  योजनेअंतर्गत येणाऱ्या सालाकरता गरजू लोकांची निवड करण्यासंदर्भात एकमत झाले. अमृत योजनेअंतर्गत नवीन 32.83 करोड रुपयाच्या अनुदानाकरता क्रिया योजनेला मंजुरी देण्यात आली. आयुक्त नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना भाडेतत्त्वावर वाहन घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली. पण विषय सूचीतील सर्व विषयांची मंजुरी मिळवताना सर्व बाबतीतील टेंडर काढून योग्य व कमी खर्चिक मार्ग निवडण्याचे एकमताने ठरविण्यात आले. पुढे सभेमध्ये स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. पालिका शाळेतील शिक्षकांच्या भरतीमध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. कागदावरच अनेक वर्षे रेंगाळत राहिलेल्या राजे शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचा उर्वरित कामाचा परत श्री गणेशा करण्याचे ठरवण्यात आले. जुन्या गाळे धारकांना 25% भाडेवाढ करून त्यांना पुढील एक वर्षासाठी भाडेवाढ देऊन कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोकाट जनावरांची नसबंदी करून कायमचा बिमोड करण्याचा ठराव करण्यात आला. पार्किंग संदर्भात पोलीस प्रशासनास संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. सर्व स्मशानभूमीचा विकास युद्ध पातळीवर करण्याचे ठरवण्यात आले. मागील दीड वर्षांपूर्वीच रिपेरी केलेल्या दुभाजकांची रिपेरी परत करण्याचे ठरवण्यात आले. भकास उद्यानाचा विकास करण्याचे ठरले. जुनी शौचालय पाडून नवीन शौचालय होणार. विविध मंडळ व समाजाला प्रशासनाच्या मालकीच्या जागा देण्यावर एकमत झाले. आयत्यावेळी आलेल्या व नगराध्यक्षांनी परवानगी दिलेल्या अनेक विषयांना सर्वानुमते समाधी देण्यात आली.

शेवटी वरील सभे समोरील ठेवलेल्या 30 विषयाचा सखोल अभ्यास करून योग्य दराची टेंडर काढून सर्व नगरसेवक व नगरसेविकेना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे आयुक्त, नगराध्यक्ष, व उपनगराध्यक्ष यांनी ग्वाही देऊन सर्वसाधारण सभा आटोपती घेण्यात आली.

सर्व विषयाचे वाचन श्री शरद सावंत यांनी केले शेवटी सर्व नागरिकांचे व उपस्थित सर्व नगरसेवकांचे नगराध्यक्ष सोनल कोठडिया  व उपाध्यक्ष संतोष सांगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.


नगराध्यक्षांची उपस्थिती आश्वासक….

नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौ कोठडिया यांची कालची पहिलीच सर्वसाधारण सभा. पण त्यांचा सभागृहातील वावर आश्वासक वाटत होता. व सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे प्रत्येक विषयाला धरून त्यांनी आश्वासन दिल्यामुळे त्यांचा सभागृहातील उपस्थिती आश्वासक वाटत होती.


धर्मवीर संभाजीराजे चौकाचे सर्वांना सोबत घेऊन सुशोभीकरण करणारच -उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर

निपाणी धर्मवीर संभाजी राजे चौकातील स्थित असलेल्या चबुतऱ्यावर राजांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवला जाणारा असून या चौकातील सर्व नागरिकांच्या सोबत बैठक घेऊन पुतळ्यासह  चौकाचे सुशोभीकरण करणार असल्याचे सुतोवाच  स्वतःच उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर  यांनी केल्यामुळे सभागृहातील सर्व नगरसेवक व धर्मप्रेमी मराठी बांधवांनी टाळ्या वाजवून त्यास संमती दर्शवली.


विरोधी पक्षातील नगरसेवकांनी कात टाकल्याचे जाणवले 

कोणत्याही देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा  किंवा पंचायतीचा विकास व्हायचा असेल तर त्या सभागृहातील विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो. याचाच प्रत्यय निपाणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिसला. नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते व नगरसेवक शेरू बडेघर, रवींद्र शिंदे, शौकत मनेर, अनिता पठाडे, विनायक वडे, यांनी प्रत्येक 30 विषयाचा सखोल अभ्यास करून प्रत्येक विषयावर आपलं मत ठासून मांडून विरोधी पक्षाने आता कात टाकल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.


सत्ताधारी गटाचे अभ्यासु नगरसेवक -विलास गाडीवड्डर

सत्ताधारी गटातील जयवंत भाटले, राजू गुंदेशा ,जसराज गिरी, नीता बागडे, आशा टवळे, यांनी किल्ला लढवत वरील विषयांचे समर्थन करत नगराध्यक्षांना पाठबळ देत होतेच. पण अधिकाऱ्यांना धारेवर धरत विकास कसा साधायचा याचा कानमंत्र दिला तो माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी. उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर कायदेशीर बाबींचा कानोसा घेत मांडलेला विषय सरकार दरबारी कसा संमत होईल याचा सभागृहासमोर लेखाजोखा मांडण्याचा जो काय प्रामाणिक प्रयत्न चालू होता त्याला खरच दाद द्यावी लागेल. कारण मागील काही महिन्या पूर्वी हेच विरोधी बाकांवर बसणारे गाडीवड्डर ज्या काही सूचना करून विकास साधण्याचा मंत्र देत होते. आज सत्ताधारी बाकावरून देखील प्रामाणिक सल्लामसलत करत विकास साधण्याचा हेतू साध्य करत होते. व सभागृहांमध्ये देखील त्यांच्या बोलण्यावर दाद मिळत होती.


पण शेवटी झाला राडा…

आज पर्यंत झालेल्या कोणत्याही आमदारांनी खासदारांनी नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी आमच्याकडे लक्ष दिले नसून आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असे वाक्य कार्मिक कर्मचाऱ्यांनी काढल्यामुळे सभा गृहात एकच गदारोळ माजला. कामगार आणि नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नगराध्यक्षा सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक विलास गाडीवड्डर जयवंत भाटले, बाळासाहेब देसाई सरकार, नीता बागडे, यांनी कामगारांना समज दिली. व जी काय समस्या आहे ती योग्यरित्या मांडण्याचा सल्ला दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!