कागल तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा दिशा अकॅडमी बाचणी येथे संपन्न!
निपाणी नगरी प्रतिनिधी देवचंद कॉलेज अर्जुननगर, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कागल तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा दिशा अकॅडमी बाचणी येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. १९ वर्षा खालील मुलाच्या संघाने प्रथम क्रमांक व मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली असून त्यांना संस्थेचे अध्यक्ष, श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्तीभाभी शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे ,उप- प्राचार्य डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाच्या उप-प्राचार्या सौ. एस. पी. जाधव, डॉ. ए.एस.डोनर, जिमखाना प्रमुख डॉ.आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक निरंजन रवींद्र जाधव, वैभव सोनार, शिवदास चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.