आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

देवचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले शेतकरी व कारखान्यातील कामगारांना सायबर सुरक्षेचे धडे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (23) अर्जुननगर 

येथील देवचंद कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमिदवाडा येथे कारखान्यातील सर्व कामगार, पदाधिकारी व उपस्थित शेतकरी यांना सायबर गुन्हे व सुरक्षितता याबद्दल माहिती दिली.

कारखान्यातील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये  बोलताना प्रा. प्रशांत कुंभार यांनी देवचंद कॉलेज, अर्जूननगर व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा : कमवा व शिका” या उपक्रमाची माहिती दिली. तर सायबर वॉरियर क्लबचा अध्यक्ष कु. हर्षवर्धन जबडे याने सायबर गुन्हे कसे घडतात व त्यामुळे होणारे तोटे याची माहिती दिली.

कु. वैष्णवी चौगुले हिने मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, शेतकरी व सामान्य लोकांची होणारी फसवणूक, ऑनलाईन आर्थिक व्यवहारातून होणारी फसवणूक, ओटीपी शेअर करणे याबद्दलची माहिती सांगून अशी कोणती घटना घडली तर त्याची तक्रार कोठे व कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तर सायबर वॉरियर क्लबची सचिव कु. समृद्धी भराडे हिने उपस्थितांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमिदवाडा चे एम. डी. श्री. एन. व्ही. पाटील यांनी बोलताना स्वतः सोबत घडलेला किस्सा सांगितला व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व महाविद्यालय व विध्यार्थ्यांचे आभार मानले.

या उपक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, आणि उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे व उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. पी. शाह यांचे मार्गदर्शन मिळाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!