आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत पारितोष पाटील प्रथम!
शालेय वक्तृत्व स्पर्धेत बालवाडी ते दहावी एकूण 9 गटात स्पर्धा पार पडली!
निपाणी नगरी प्रतिनिधी (22)
दि फीमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत कै. ए एस कुलकर्णी सर आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप बोभाटे सर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी हे उपस्थित होते कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रसन्न जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने झाली. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले.सौ.ए आर पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली
यावेळी बोलताना श्री प्रदीप बोभाटे म्हणाले माध्यमिक शिक्षण हे आपल्या आयुष्याला वळण देण्याचे काम करते त्यामुळे शिक्षक व आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करा आपल्या जीवनात जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमी प्रयत्न करा प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा आपल्या जीवनात वक्तृत्व केलेला खूप महत्त्व आहे.
आंतरशालेय वकृत्व स्पर्धा निकाल
प्रथम पारितोष विनायक पाटील जी.एम. संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी द्वितीय आकांक्षा बाळासाहेब पाटील एस.बी.एस कन्या शाळा निपाणी तृतीय वेदश्री अनिरुद्ध कुलकर्णी एस बी एस कन्या शाळा निपाणी उत्तेजनार्थ श्रावणी अविनाश टिंगरे एम.डी विद्यालय अर्जुननगर ऐश्वर्या अशोक माने अक्कमहादेवी कन्या विद्यालय संकेश्वर प्रतीक्षा वसंत पाटील न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा
यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले शालेय वक्तृत्व स्पर्धेत बालवाडी ते दहावी एकूण 9 गटात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आराध्या पंकज शिंदे, श्रावणी सागर माकणे आदिती मनोज चव्हाण, शुभ्रा सूर्यकांत नाईक, शरयू सचिन सुतार भूमी विजय जाधव वेदश्री अनिरुद्ध कुलकर्णी सृष्टी धर्मेंद्र पाटील.
आंतरशालेय स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री एस एस परीट, सौ एस आर पाटील, सौ. एम डी काळे यांनी काम पाहिले. प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. परीक्षक श्री एस एस परीट यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास यु बी नागावे ओ एस कुलकर्णी बी ए निगवे एस एस घाटगे, जे एम शिंत्रे, जे सी चंद्र कुडे, मंगसुळे, कुरबेट्टी, के एस भादुले ,कवाळे, आर व्ही मधाळे,आर व्ही घाटगे यांच्या सह शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. श्री आर पी बामणे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री पी आर पाटील यांनी आभार मानले.