आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

धनलक्ष्मी सौहार्दला आर्थिक वर्षात 54 लाखांवर नफा- अध्यक्ष रवींद्र शिंदे!

संस्थेच्या 26 व्या वार्षिक सभेत दिली माहिती! लवकरच स्व-मालकीच्या बहुमजली इमारतीत संस्थेचे स्थलांतर!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (22)

निपाणी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था श्री धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेला मागील आर्थिक वर्षात तब्बल 54 लाख 86 हजारांवर निव्वळ नफा झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या स्व मालकीची बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विद्यमान नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी दिली ते येथील धनलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते.

संस्थेचे सेक्रेटरी अनिल भोसले यांनी संस्थेचे 30 लाख 53 हजारांवर भाग भांडवल, 3 कोटी 68 लाखांवर राखीव व इतर निधी, 16 कोटी 60 लाख 99 हजारांवर ठेवी, 10 कोटी 36 लाख 48 हजारांवर गुंतवणूक, 11 कोटी 25 लाखांवर कर्ज वितरण झाले आहे. सभासदांना 25 टक्के लाभांश देण्यात येणार आहे.

यावेळी उपाध्यक्ष मधुकर खवरे, संचालक सुनील वाडकर महेंद्र सांगावकर यांच्यासह गोपाळ नाईक, विठ्ठल वाघमोडे, झुंजार दबडे, गजानन शिंदे, यांच्यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!