आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

गोल्ड @ 75 तर सिल्वर @ 90

दोन महिन्यात सोन्यात तब्बल 6000 ची घसघशीत वाढ! अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे हि वाढ अपेक्षित आहे!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (25)

भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच आज भारतीय सराफी बाजारात मोठी उलाढाल होत सोने 75 हजाराची सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठत चांदी बाजारात देखील 90 हजार रुपयाचा प्रति किलोचा भाव दाखवत 29 मे रोजी चा 94 हजार 280 च्या उच्चांकी दराच्या जवळ जाऊन सलामी देत काल सर्वत्र खळबळ निर्माण केली आहे.

पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे असणारे सर्व आभूषणे करण्यात भारतीय स्त्रिया अग्रक्रमाने पुढे होत्या. व त्यावेळी अनेक सोन्याचे जिन्नस  करण्यास स्त्रियांना देखील मोठाच आनंद प्राप्त होत होता. सणासुदीच्या काळात तर प्रत्येक घरामध्ये सोने खरेदीची लगबग एक वेगळा सोहळाच होऊन जातं असतं. पण कालानुरूप सोन्या-चांदीच्या खरेदीची जागा सर्वांच्याच अवाक्यात येत गेल्यामुळे त्याला आता संकुचित रूप राहिलेले नसून अनेक प्रकारे सोने चांदी खरेदीचा मार्ग उपलब्ध झाल्यामुळे आज प्रत्यक्ष सोने घेण्याची किंवा देण्याची गरज नसून ऑनलाईन पद्धतीने खरेदी अथवा विक्री करता येत असल्यामुळे  सोन्याची 75 हजाराची वाढ म्हणजे गोरगरीब जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करत एक कृत्रिम झळाळी निर्माण करत सोनी प्रती तोळा 75000 हजाराची लय लूट करत चांदीने 90000 ची सलामी दिली आहे.

बुधवारी सराफी बाजारात सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून सोन्याचा भाव प्रति दहा ग्रामसाठी 75 हजार रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. आयबीजेए दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम साठी 75 हजार 288 रुपये पोहोचला. हाच भाव मंगळवारी 74 हजार 764 रुपये होता. एकंदरीत या आठवड्याभरात सोन्याने प्रति ग्राम मागे बाराशे रुपयांनी महागले असून राजधानी मध्ये आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे 77 हजार 170 रुपयावर पोहोचला आहे.

आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून किलोमागे चांदीच्या भावात 1922 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज प्रति किलो 90300 वर पोहोचला. यापूर्वी चांदीचा भाव 88 हजार 400 दोन रुपये होता यावर्षी चांदीने 29 मे 2024 रोजी प्रति किलो 94 हजार 280 रुपयांचा उच्चांक गाठला होता. या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 28 टक्के पेक्षा जास्त आणि भारतीय बाजारपेठे अंतर्गत 19% पेक्षा जास्त वाढला आहे. सोन्याने इतर सर्व मालमत्तांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. सदरची सोन्याची झळाळी अमेरिकन डॉलर कमकुवत होत गेल्यामुळे वाढले असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!