आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूलचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

बेनाडी येथील काड सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये स्पर्धेचे आयोजन!

Kiran Gopalrao Patil M,88884357516


बेनाडी येथील काड सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत मॉडर्न इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी स्वरा ए. जाधव हिने यश संपादन केले. मुलींच्या 17 वर्षे वयोगटातील निपाणी तालुका बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच निपाणी तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा व्यायाम शाळा, निपाणी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देखील 14 वर्षे वयोगटातील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून मुडलगी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर हायस्कूल कुरली येथे झालेल्या तालुकास्तरीय मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्राथमिक आणि प्रौढ शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. निपाणी मध्ये झालेल्या कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये देखील कु. रोहित पाटील आणि कु. शिवानंद मगदूम या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झाली.

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मराठा मंडळ बेळगाव संचलित, मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे  तसेच क्रीडा शिक्षक श्री सुकुमार गोरवाडे व श्री एस.डी. पवार  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना एम. एम. बी. एस. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री हलगेकर नागराजू  यांनी शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!