आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत एम डी विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश!
निपाणी नगरी प्रतिनिधी (26) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी नूहा देसाई हिने कागल येथील स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंती निमित्त आयोजित तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत कापशी केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल रोख 1000 रुपये व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून तिचे कौतुक होत आहे सदर यश मिळविण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्यासह एस एच श्रीखंडे व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले