आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सैनिकी शाळेमध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी!

Kiran G.Patil M.No.8884357516


कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील , उपाध्यक्ष अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते.

प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अनिस मुला यांनी केले . यानंतर उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन देण्यात आले . यानंतर उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षक मनोगतामध्ये अलिंता फराकटे यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवन कार्याचा आढावा देताना त्यांचे योगदान स्पष्ट केले तर सरिता दिवटे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती देताना त्यांचे कार्य स्पष्ट केले. यानंतर अध्यक्ष मनोगतामध्ये संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष केला असल्याचे सांगितले. तसेच देशामध्ये ऐक्य राखण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांनी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना मधाळे यांनी केले तर आभार श्रीनिवास नलवडे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!