आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे जुदो स्पर्धेत घवघवीत यश!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी ( 2)

कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या शाळेने स्तवनिती येथे झालेल्या तालुकास्तरीय जुदो स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे . या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . यामध्ये प्राथमिक विभागातून ओमकार पालकर ,प्राची मगदूम , वैदही लोहार ,श्री चौगुले ,यशस्वी कासोटे यांचा द्वितीय क्रमांक तर श्रेयस नलवडे याचा प्रथम क्रमांक आला असून त्याची जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच माध्यमिक विभागातून तेजस थोरात , श्रीरंग बिरांजे ,सार्थक मलेदार, आदित्य पाटील ,श्रुती शिरगुपे, वैष्णवी माने ,प्राची मगदूम यांचा द्वितीय क्रमांक तर आदित्य तिबिले ,साईराज पवार ,अवंती देसाई, तन्वी जाधव यांचा तृतीय क्रमांक तर प्रीती माणगावे व हर्षद बोते यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांची जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

या विद्यार्थ्यांना महेश वरुटे ,विनायक कांबळे ,दीपक पाटील, सतीश कुंभार ,शुभम निले, हैदर अली ,प्रज्ञा माने ,स्नेहल बेलेकर, सरिता दिवटे ,रूपा खोत यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील ,सचिव कुमार पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!