आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सैनिकी शाळेचे कुस्ती स्पर्धेत सुयश !

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी(2)

कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी संकुलाने निपाणी येथील के एल ई येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे . प्राथमिक व माध्यमिक स्तरावर झालेल्या या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये प्राथमिक विभागातून श्रेयस नलवडे, प्रतीक हिंग्लजे, समीक्षा केसरकर यांचा द्वितीय क्रमांक तर लक्ष गुदले ,वैदेही लोहार, हर्षदा मगदूम, प्रज्ञा तावदारे यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. तसेच माध्यमिक विभागातून तेजस थोरात, सार्थक मालेदार ,वेदांत माने ,साक्षी अल्लुरे, श्रुती शिरगुप्पे, गणेश कांडेकर ,तोहीद मुल्ला, आयान जमादार यांचा द्वितीय क्रमांक तर योगेश आरगे व हर्षद बोते यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे . तसेच प्राथमिक विभागातून ऋतिका हुजरे व श्रेया कोळी यांचा प्रथम क्रमांक तर माध्यमिक विभागातून माहेश्वरी सोकांडे व राजनंदिनी चौगुले यांचा प्रथम क्रमांक आला असून यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुमित खोत ,महेश वरुटे ,शिवाजी डवर ,अभिजीत गुडस्कर ,ऋतुराज कांबळे ,निखिल पाटील ,सरिता दिवटे , प्रज्ञा माने, स्नेहल बेलेकर ,रूपा खोत यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील ,सचिव कुमार पाटील ,प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!