आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीतील “त्या” खुन प्रकरणातील सात जणांच्या मुसक्या आवळल्या!

पोलीस तपासास अवघ्या 48‌ तासात यश, पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (6)

मागील दोन दिवसा पूर्वी निपाणी उर्दू शाळेजवळ झालेल्या रात्रीच्या थरार नाट्याचा अखेर शेवट झाला असून. अश्रफअली नगारजी यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून संशयित आरोपी म्हणून अकरा लोकांच्याकडे संशयाची सुई फिरली असून त्यातील सात आरोपींना जेरबंद करण्यात निपाणी शहर पोलीस ठाण्यास यश मिळाले असून. पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अश्रफ अली खून प्रकरणातील सात जणांना जेरबंद करत निपाणी पोलिसांनी खून प्रकरणाचा 48 तासात छडा  लावला आहे. निपाणीतील भीम नगरात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंड अश्रफअली नगारजी याचा एक टोळक्या कडून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली होती. या प्रकरणातील आरोपींना 48 तासात जेरबंद करण्यात निपाणी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील एकूण 11 पैकी सात आरोपींना जेरबंद करण्यात आले असून उर्वरित चार आरोपीचा शोध सुरू आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादावादी तून हा खून झाला असला तरी यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा विचार करता टोळी युद्धातून हा भडका उडाला असल्याची सर्वत्र चर्चा आहे. रवी इराण शिरगावे वय वर्षे 27 रा. हणबर गल्ली, निपाणी रोहित प्रशांत पठाडे वय वर्षे 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी साखरवाडी निपाणी, ओम दिलीप कंदले वय वर्षे 23 राहणार कुंभार गल्ली निपाणी, पारस संजय श्रीखंडे वय वर्षे 22 राहणार बसव सर्कल नजीक जत्राटवेस निपाणी, ऋतिक सदाशिव पावले वय वर्षे 25 राहणार महादेव गल्ली निपाणी, अरबाज राज मोहम्मद सय्यद वय वर्षे 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी साखरवाडी, अनिकेत कृष्णा घोडगे वय वर्षे 24 राहणार सासणे गल्ली निपाणी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी अश्रफअली व सहकारी आणि रवी शिरगावे व त्याचे सहकारी यांच्या जोरदार वादावादी झाली होती. यावेळी एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली होती. अशातच रवी याचा मित्र अभिषेक दतवाडे याचा दोन वर्षांपूर्वी मानवी गल्ली येथे खून झाला होता. अभिषेक याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या खुणाचा बदला घेण्याचे काही मित्राने ठरवले होते. यातच अश्रफअली याने रवी याच्याही खुणाचा कट रचल्या ची माहिती रवीला समजली होती. त्यामुळे आपल्या खुणाचा कट रचणाऱ्याचा आपणच खून करायचा या उद्देशाने हा खून झाल्याचे तपासात दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक तपास निपाणी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा व त्यांचे सहकारी करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!