आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

हादगा देव मी पूजिते, सख्यांना बोलविते!

मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये सामूहिक रित्या हादगा संपन्न

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (7)

अगदी अनादी काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीने “आ नो भद्रा क्रतवो यंन्तू विश्वत “,या वेदातील उक्तीप्रमाणे उत्तम ते ते स्वीकारले. त्यामुळेच भारतीय संस्कृती परंपरा विविधतेने नटलेली दिसते. भारतीयांनी या संस्कृती परंपराचे जतन व संवर्धन केल्याने युगानयुगे या परंपरा टिकून आहेत. हादगा हा असाच स्त्रियांचा उत्सव.

सर्वांना सोबत घेऊन सामूहिकतेचा ,एकतेचा आणि समतेचा संस्कार आपोआप मनात रुजविणारा हा लोकोत्सव आणि स्त्री मनाचा भाबड्या भावना, दुःख, वेदना ,हळवेपणा आणि जीवनातील संघर्ष यातून फुलत जाणारे स्त्री जीवन अशा अनेक विविध गोष्टीचे वर्णन दिसून येणारा हा सामूहिक सण आणि त्यातून खिराफत ओळखणे हा या उत्सवातील मोठा सोहळाच.

आज काळ बदलत असला तरी आपली भारतीय संस्कृती व परंपरा यांच्याशी आपली नाळ अशीच कायम जोडलेली असावी व यासाठी अशा लोकपरंपरांचे जतन संवर्धन होणे आवश्यक आहे. या सामूहिक ,संघटित ,समरस जीवनाचे शिक्षण शाळेतूनच द्यावे व या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी या शाळेने नवीन संकल्पना राबवून सहामाही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी परीक्षेचा ताणही संपल्यानंतर शाळेने सामूहीकरीत्या हादगा सादरीकरण आयोजित केला होता.

या कार्यक्रमास मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जी नागराजू, मॉडर्न इंग्लिश शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे ,सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मॉडर्न इंग्लिश स्कूलने राबविलेल्या या शाळेच्या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!