आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सौ.भा. शाह कन्या शाळेतील विद्यार्थीनींची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड!

Kiran G.Patil M.No.8884357516


दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथी बाई शाह कन्याशाळेतील विद्यार्थीनींनी चिकोडी जिल्हास्तरीय, तायक्वांदो स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.

नुकत्याच रायबाग याठिकाणी चिकोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत इशरा नासिर मकानदार (68 किलो वजनी गट) – सुवर्णपदक इकरा नासिर, मकानदार (68+ किलो वजनी गट) सुवर्णपदक मिळविले स्पर्धेत दोघींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या विद्यार्थीनीची चिक्कमंगळूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन, श्रीमान आशिषभाई शाह व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थीनींना शाळेच्या प्रभारी मुख्याधापिका डॉ सौ. एस जे.पाटील व क्रीडा शिक्षिका सौ. ए. डी. पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!